सिल्लोड शहरात नगर परिषदेच्यावतीने उभारलेल्या इंदिरानगर प्रवेशद्वाराचे लोकार्पण

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी) : शहरात नगर परिषदेच्या वतीने उभारलेल्या इंदिरा नगर प्रवेशद्वाराचे लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते थाटात झाला. लोकार्पण सोहळा निमित्त सदरील प्रवेशद्वाराला विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. हा अविस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी जो तो प्रयत्न करीत होता. लोकार्पण होताच येथील रहिवासीयांनी एकच जल्लोष केला.
काही वर्षांपूर्वी झोपडपट्टीत राहणाऱ्या इंदिरा नगर भागातील नागरिकांचा परिवार विस्तारीत झाला आहे. राहण्यासाठी आहे ती जागा अपूर्ण असल्याने येथील रहिवासीयांना जी प्लस ३ या संकल्पनेतून घरे बांधून देणार असल्याची ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. इंदिरा नगरमध्ये सर्व समाजाचे लोक एकोप्याने राहतात.


इंदिरा नगर वासीयांनी माझ्या राजकिय जीवनात कायम साथ दिली. विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात इंदिरा नगर वासीयांचा सिहांचा वाटा असल्याचे सांगत इंदिरा नगरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केले. पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देण्याचे आवाहन केले. समाजातील मागास व भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातात. पण आपण जर आपल्या पाल्याना चांगले शिक्षण दिले तर त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव होते असे स्पष्ट करीत विधानसभा निवडणुक नंतर पहिला आमदार निधी इंदिरा नगर ला देणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले की, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने समाजातील सर्व घटकांना न्याय देत शहरात जवळपास ४० ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली. शहरात उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वार मुळे शहराच्या सौन्दर्यात भर पडली. इंदिरा नगर प्रवेशद्वार साठी राजस्थान राज्यातून विशेष प्रकारचा गुणवत्तापूर्ण दगड मागविण्यात आला असे अब्दुल समीर म्हणाले. 

आम्ही कायम शहर वासीयांच्या सेवेत कार्यरत असतो. कोरोना असो किंवा नैसर्गिक आपत्ती प्रत्येक संकटात, सुखदुः खात आम्ही सोबत असतो. या लोकार्पण सोहळा प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, माजी सभापती रामदास पालोदकर, संचालक नंदकिशोर सहारे, शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडेलेचा, विठ्ठल सपकाळ किशोर अग्रवाल, शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, प्रताप प्रसाद, संजय डमाळे, राजेंद्र ठोंबरे, सुनील दुद्धे, अकील देशमुख, सत्तार हुसेन, भिकचंद कर्नावट, तुषार चौधरी, रवी गायकवाड फईम पठाण, शेख इम्रान, मोईज शेख, बबलू पठाण, डॉ. फिरोज खान, ईश्वर कालमिले तसेच इंदिरानगर येथील कालूसिंग टाक, रामा कापरे, बाबुराव उबदे, शिवाजी कापरे, स्वामी गुडे, साहेबराव शिंदे, अंकुश मामडे, शंकर कापरे, गोविंदा मामडे, संजय शिंदे, अजयसिंग टाक, कैलास उबदे, शिवाजी शिंदे, रवी कापरे, शामसिंग टाक, व्यंकट शेवाळे, रवी शेवाळे, प्रेमसिंग टाक, शक्तीसिंग टाक, संजय कापरे . हिम्मत धोत्रे, दिलीप धोत्रे, लखन शेवाळे, लखनसिंग टाक, अंकुश शिंदे, गंगाधर शिंदे, चंदू उबदे, सुनील कडमीचे, गोरख धोत्रे, राहुल शेवाळे, सचिन शिंदे आदींची उपस्थिती होती.
कापरे, बाबुराव उबदे, शिवाजी कापरे, स्वामी गुडे, साहेबराव शिंदे, अंकुश मामडे, शंकर कापरे, गोविंदा मामडे, संजय शिंदे, अजयसिंग टाक, कैलास उबदे, शिवाजी शिंदे, रवी कापरे, शामसिंग टाक, व्यंकट शेवाळे, रवी शेवाळे, प्रेमसिंग टाक, शक्तीसिंग टाक, संजय कापरे , हिम्मत धोत्रे, दिलीप धोत्रे, लखन शेवाळे, लखनसिंग टाक, अंकुश शिंदे, गंगाधर शिंदे, चंदू उबदे, सुनील कडमीचे, गोरख धोत्रे, राहुल शेवाळे, सचिन शिंदे आर्दीची उपस्थिती होती.